मुंबई : पेशावरवर ज्यांनी हल्ला केला होता, त्यातल्याच काही लोकांनी आमच्या इलाहाबादच्या संस्थेवरदेखील हल्ला केला होता. मी सगळ््यांनाच शांतीचा संदेश देऊ शकत नाही. आम्ही असे म्हणत नाही की, आम्ही सगळ््यांपर्यंत पोचू शकतो. पण शक्य आहे तितक्यांना शांतीचा संदेश आम्ही देत आहोत, असे ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी एका कार्यक्रमात सांगितले.दोन दिवसांसाठी श्री श्री रविशंकर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या वेळी ते पत्रकारांशी बोलले. सामाजिक कार्यात तरुणांचा सहभाग असायला हवा. कुटुंबाविषयी त्यांना आपुलकी वाटली पाहिजे. सध्या लोकांना फूस लावून धर्मांतर होत आहे. हे योग्य नाही. एकाच धर्माला धर्मांतरासाठी परवानगी न देणे अयोग्य आहे. याविषयी कायदा असला पाहिजे, असेही ते म्हणाले. पुढे त्यांनी भारतात वाढत असलेला ताण हा आरोग्यास हानिकारक असल्याचे सांगितले. योग भारताने जगाला दिलेली ठेव आहे, असे मत त्यांनी मांडले. महाराष्ट्रात ‘साउंड आॅफ पीस’साठी दोन दिवसांचा कार्यक्रम आखलेला आहे. इराक येथे होत असलेल्या हिंसाचारामुळे जगभरात पसलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी ११ जानेवारी रोजी सगळीकडे मंत्रोच्चारण केले जाणार आहे. वांद्रे- कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हे मंत्रोच्चारण होईल. सोमवार, १२ जानेवारीला याच ठिकाणी रुद्रपूजा केली जाणार आहे. तर याच दिवशी नाशिकच्या तपोवन येथील साधूग्राम येथे सायंकाळी ६ वाजता ५ हजार बासरीवादक एकत्र बासरीवादन करणार आहेत. या कार्यक्रमाला पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची उपस्थिती लाभणार आहे. (प्रतिनिधी)