Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा माज उतरवायला सेना समर्थ

By admin | Updated: October 30, 2015 09:10 IST

शिवसेनेचे बोट धरून आपण इथपर्यंत आलात, याची जाणीव ठेवा, मोठे व्हा, पण माजू नका अन्यथा माज उतरवायला शिवसेना समर्थ आहे

कल्याण : शिवसेनेचे बोट धरून आपण इथपर्यंत आलात, याची जाणीव ठेवा, मोठे व्हा, पण माजू नका अन्यथा माज उतरवायला शिवसेना समर्थ आहे, असा सज्जड इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याणच्या सभेत भाजपला दिला.येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या सभेत त्यांनी ठाकरी भाषेत भाजपसह मनसे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा समाचार घेतला.२५ ते ३०वर्षांपूर्वी हिंदुत्त्वाला देशपातळीवर महत्त्व नव्हते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी हिंदुत्व देशभर पोहोचविले. आता पाकिस्तानही याची दखल घेत आहे. राष्ट्रवादाचे धडे आम्हाला त्यांनी शिकवू नये असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता दिला.शत्रू ते शत्रू आता मित्रही शत्रू झाले आहेत. निवडणुकीची लढाई ही साधीसुधी नाही. आतापर्यंत अनेक लढाया झाल्या, अगोदर विरोधक होते आता मित्रही अंगावर यायला लागले आहेत, अशा शब्दात त्यानी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेला गाडायला निघालेल्यांच्या, ७०० पिढ्याही काही करू शकणार नाहीत. एकनाथ खडसे! ही गर्दी येऊन बघा म्हणजे कळेल, असे आव्हान त्यांनी दिले. त्यांच्या बुडाखालच्या खुर्चीला बुडबुडे आल्याने ते बरळत असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला. आमच्या अंगावर येऊ नका २५ वर्षे तुम्ही दोस्ती पाहिली वाघाचा पंजा पाहिलेला नाही असा इशारा त्यांनी दिला. काही लोक नाशिकची बतावणी करीत मते मागत असल्याचा टोला राज यांना लगावून ते पुढे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांच्या नावाने नाहीतर काय तुमच्या नावाने मत मागायची? कुत्रं तरी फिरकेल का अशा शब्दात त्यांनी पलटवार केला.