ठाणो : अमली पदार्थासारख्या एमडी पावडरची विक्री करण्यासाठी आलेल्या अरुण नाडर या ऑटोमोबाइल इंजिनीअरला ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केले आहे. त्याच्याकडून 15 लाख रुपये किमतीची तीन किलोची एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.
ठाणो रेल्वे स्थानक परिसरात एमडी पावडरची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची ‘टीप’ गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार, अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे आणि उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी 7 डिसेंबर रोजी सापळा लावला. नाडर सायंकाळी 4 वा.च्या सुमारास एमडी पावडर विक्रीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आला तेव्हा त्याला या पथकाने ताब्यात घेतले. एका ग्रॅमला 5क्क् रुपयांना ही पावडर विकली जाते. तिचे मोठय़ा प्रमाणात सेवन केल्याने मृत्यू ओढवतो, अशी माहिती धर्माधिकारी यांनी दिली. नाडरचे वडील अंडीविक्रेते असून त्याचा स्वत:चा कल्याणमध्ये केबलचा व्यवसाय आहे. चेन्नई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला अरुण गेल्या काही दिवसांपासून काहीसा विचित्र वागत होता. त्याला आता 13 डिसेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)