Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी विथ वारकरी...!

By admin | Updated: July 11, 2015 23:39 IST

गेल्या काही वर्षांत पंढरीची वारीही ‘ग्लोबल’ झाली आहे. त्यामुळे आता या वारीला व्हर्च्युअल विश्वाची जोड देण्यासाठी फेसबुक दिंडीने ‘सेल्फी विथ वारकरी’ हा उपक्रम सुरु केला आहे

मुंबई : गेल्या काही वर्षांत पंढरीची वारीही ‘ग्लोबल’ झाली आहे. त्यामुळे आता या वारीला व्हर्च्युअल विश्वाची जोड देण्यासाठी फेसबुक दिंडीने ‘सेल्फी विथ वारकरी’ हा उपक्रम सुरु केला आहे. पांडुरंगाच्या ओढीने पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसोबत ‘सेल्फी’ काढून सोशल साइ्टसवर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संत तुकाराम महाराज यांचा अकरावा वंशज असणाऱ्या स्वप्निल मोरे या तरुणाने फेसबुक दिंडी हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदा फेसबुक दिंडीचे अ‍ॅपही लाँच करण्यात आले. या अ‍ॅपलाही देश-विदेशातून उत्तमोत्तम प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)