Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ‘खेळ’ची निवड

By admin | Updated: January 8, 2015 22:34 IST

उत्कर्ष थिएटर्सच्या आयोजित श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालय यांच्या वतीने कर्जतच्या बालकलाकारांचे ‘खेळ’ हे बालनाट्य स्पर्धेत उतरणार आहे.

कर्जत : १२ व्या महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेत कर्जतमधील उत्कर्ष थिएटर्सच्या आयोजित श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालय यांच्या वतीने कर्जतच्या बालकलाकारांचे ‘खेळ’ हे बालनाट्य स्पर्धेत उतरणार आहे. या बालनाट्याची रंगीत तालीम बुधवारी रात्री कर्जतकरांसाठी सादर करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नाट्य रसिक उपस्थित होते.कर्जत तालुक्यातील लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून यादृष्टीने उत्कर्ष थिएटर्स नेहमीच प्रयत्न करीत असते. दरवर्षी हिवाळी सुट्टीमध्ये बालनाट्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्या शिबिरात प्रसिध्द कलाकारांचे मार्गदर्शन देण्यात येते. बालनाट्य स्पर्धेमध्ये या संस्थेतील बालकलाकारांना संधी देण्यात येते. यंदासुद्धा ‘खेळ’ हे बालनाट्य राज्य बालनाट्य स्पर्धेत उतरविले आहे. या बालनाट्याची रंगीत तालीम डोंबे विद्यानिकेतन विद्यालयाच्या रंगमंचावर सादर करण्यात आली.या बालनाट्याचे लेखक प्रदीप जंगम असून दिग्दर्शन प्रदीप गोगटे यांनी केले आहे. सहाय्यक दिग्दर्शन व संगीताची जबाबदारी दिलीप गोगटे यांनी सांभाळली आहे. नेपथ्य प्रमोद दिघे, वेशभूषा माधुरी गोगटे, रंगभूषा व प्रकाशयोजना अभय शिंदे आणि रंगमंच व्यवस्था बाबू सकपाळ, जितेंद्र वझे, सचिन राऊत यांच्याकडे आहे. सौमित्र भिडे, मिथिल पारकर, समीक्षा मेढी, ॠषिकेश देशमुख, मानस निघोजकर, आणि स्निग्धा जोशी या बालकलाकारांनी या बालनाट्यात भूमिका साकारल्या आहेत. (वार्ताहर)