Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांमध्ये पीएच़डी़शिवाय प्राचार्यांची निवड

By admin | Updated: March 29, 2015 01:34 IST

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील प्राचार्य पदे भरताना महाविद्यालयांनी विद्यापीठाचे नियम धाब्यावर बसवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

नियम धाब्यावर बसवल्याची माहिती मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील प्राचार्य पदे भरताना महाविद्यालयांनी विद्यापीठाचे नियम धाब्यावर बसवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्राचार्यांच्या पदांसह महाविद्यालये आणि विद्यापीठातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचे समोर येताच याबाबत विद्यापीठाने पुढील महिन्यात बैठक बोलावली आहे.विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या सिनेट बैठकीमध्ये सदस्य संजय वैराळ यांनी महाविद्यालय प्रशासनांनी प्राचार्यांची आणि प्राध्यापकांची पदे नियमबाह्य भरली असल्याचा औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. या विषयावर विविध सदस्यांनी आपली मते व्यक्त केली. अनेक महाविद्यालयांमध्ये पीएच़डी़ नसलेल्या प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे वैराळ यांनी सभागृहात पुराव्यानिशी स्पष्ट केले.महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांसह प्राध्यापकांचीही पदे भरताना अनेक नियमांना बगल देण्यात आली असल्याकडेही वैराळ यांनी लक्ष वेधले. विद्यापीठातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मुलाखती आणि कोणत्याही परीक्षेशिवाय भरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. पीएच़डी़शिवाय प्राचार्य पदे भरलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी वैराळ यांनी लावून धरली. याप्रश्नी चर्चा करण्यासाठी विद्यापीठाने ९ एप्रिल रोजी बैठक आयोजित केली आहे.महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी पीएच़डी़प्राप्त व्यक्तीचीच निवड करण्याचा विद्यापीठाचा नियम आहे. परंतु अनेक महाविद्यालयांमध्ये पीएच़डी़ नसलेल्या प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे वैराळ यांनी सभागृहात पुराव्यानिशी स्पष्ट केले.