Join us

हजार आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी जागा शोधतोय

By admin | Updated: March 8, 2015 22:34 IST

तब्बल एक हजार आदिवासी विद्यार्थ्यांना एकाच वस्तीगृहात शिक्षण घेतील अशी जागा ठाण्यात शोधत आहोत. तसेच ती जागा भाड्याने अथवा विकत मिळाल्यास ती विकत घेण्याची

ठाणे : तब्बल एक हजार आदिवासी विद्यार्थ्यांना एकाच वस्तीगृहात शिक्षण घेतील अशी जागा ठाण्यात शोधत आहोत. तसेच ती जागा भाड्याने अथवा विकत मिळाल्यास ती विकत घेण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालघर पालकमंत्री विष्णू सावरा यांनी रविवारी ठाण्यात केले. ठाणे पूर्व कोपरीतील साईनाथ कृपा इमारतीच्या सातव्या मजल्यावर आदिवासी विद्यार्थिनींचे वस्तीगृह आहे. या वस्तीगृहात ७५ विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत. त्या वस्तीगृहाला सावरा यांनी अचानक भेट देवून येथील विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या. सुरुवातील कारवाईच्या भीतीने काही काळ विद्यार्थींनीनी बोलण्यास टाळले. मात्र, सावरा यांनी मी तुमच्या वडीलांच्या जागी आहे. तुम्ही तुमच्या समस्या वडीलांना सांगणार नाही का असे उदगार काढताच काही विद्यार्थीनीनी तेथील समस्यांचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)