मुंबई : लोकलमधील महिलांच्या डब्यातील महिलांवर होणारे वाढते हल्ले लक्षात घेता आता महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान मध्य रेल्वेच्या महिला डब्यात सेवेत रुजू केले आहेत.लोकलमधील महिला प्रवाशांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. उपनगरीय रेल्वे प्रवासी सुरक्षेची जबाबदारी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्यावर आहे.रेल्वे पोलीस दलात अपुरे मनुष्यबळ असल्याने सध्या सेवेत असलेल्या पोलिसांवर ड्युटीचा ताण येतो. रेल्वे पोलिसांतर्फे मनुष्यबळ वाढवण्याची शिफारस वारंवार सरकारकडे करण्यात आली.जीआरपीसह जवान ‘आॅनड्यूटी’रेल्वे पोलिसांसमवेत महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान लोकलमधील महिला डब्यात तैनात करण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत १०० जवान महिला सुरक्षिततेसाठी नेमण्यात आले आहेत. रेल्वे पोलीसदेखील महिला डब्यात असतील.- निकेत कौशिक, आयुक्त, लोहमार्ग रेल्वे पोलीस
महिलांच्या डब्यात सुरक्षा दलाचे जवान, रेल्वे पोलिसांतर्फे मनुष्यबळ वाढवण्याची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:42 IST