Join us  

हॉटेलच्या दाटीवाटीने कमला मिलमधील सुरक्षा वाऱ्यावरच, आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा तोकडीच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 5:27 AM

कमला मिल कम्पाउंडमधील रेस्टो-बारने गतवर्षीच्या आगीच्या घटनेनंतर धसका घेतल्याचे दिसत आहे. दुर्घटनाग्रस्त हॉटेलनजीक असलेल्या इतर हॉटेलमध्ये सुरक्षेची चोख व्यवस्था केल्याचे चित्र दिसते.

- चेतन ननावरेमुंबई : कमला मिल कम्पाउंडमधील रेस्टो-बारने गतवर्षीच्या आगीच्या घटनेनंतर धसका घेतल्याचे दिसत आहे. दुर्घटनाग्रस्त हॉटेलनजीक असलेल्या इतर हॉटेलमध्ये सुरक्षेची चोख व्यवस्था केल्याचे चित्र दिसते. मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता ही सुरक्षा यंत्रणा वरवरची मलमपट्टी असून आपत्कालीन परिस्थितीत तोकडी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.येथील काही रेस्टो-बारमध्ये ग्राहकांना बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन मार्ग तयार करताना किचनमधील कर्मचाºयांसाठीही बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवल्याचे दिसले. मात्र तरीही पहिल्या व दुसºया मजल्यावर दाटीवाटीने उभारलेल्या रेस्टो-बारमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कमला मिलमधील मोजो ब्रिस्टो आणि वन अबोव्ह येथील आगीच्या दुर्घटनांमध्ये आगीत होरपळून मृत पावलेल्या नागरिकांहून धुरात गुदमरून मृत्यू पावलेल्या मृतांची संख्या अधिक होती. म्हणूनच या ठिकाणी कोणतीही दुर्घटना झाल्यास ती तत्काळ विझविण्यासाठीची सुरक्षा यंत्रणा बहुतेक हॉटेलने उभारल्याचे दिसले. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये हॉटेलबाहेर पडण्यासाठीचा मार्गही तळाला असलेल्या हॉटेलमध्ये दिसतो. मात्र पहिल्या आणि दुसºया मजल्यावर असलेल्या रेस्टो-बारमध्ये याच त्रुटी दिसून येतात. याबाबत प्रशासनानेही अद्याप पुरेशी खबरदारी घेतल्याचे दिसत नाही. कम्पाउंडमधील मागील बाजूस असलेल्या बहुतेक रेस्टो-बारमध्ये हीच परिस्थिती दिसते.या ठिकाणी दाटीवाटीने उभारलेल्या भूलभुलय्या स्वरूपाच्या इमारतींमध्ये बहुतेक नागरिकांना हॉटेलमध्ये शिरण्याचा मार्गच कळत नाही. सायंकाळी सात वाजल्यानंतरच येथील बहुतेक रेस्टो-बारमधील नाइट-लाइफला सुरुवात होते. ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टनिमित्त सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या आॅफर्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाही मोठ्या संख्येने तरुणाई कमला मिलमध्ये एकत्रित दिसेल़ग्राहकांना माहिती देणे गरजेचे!महत्त्वाची बाब म्हणजे बहुतांश हॉटेलमधील सजावट ही अग्निरोधक नसून आग भडकविण्यास कारणीभूत ठरू शकते. विशेष म्हणजे बार काउंटरला लागून केलेल्या या सजावटीमुळेच आग भडकू शकते. त्यात दुर्घटनाग्रस्त जागेनजीक असलेल्या एका दुमजली हॉटेलमध्ये शिरताच पहिल्या मजल्यावर आत-बाहेर करण्यास एकच मार्ग दिसतो. परिणामी, या ठिकाणी तळमजल्याला कोणतीही दुर्घटना घडल्यास नेमके बाहेर कसे पडायचे? याबाबत संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते.

टॅग्स :हॉटेलमुंबई