Join us
Daily Top 2Weekly Top 5

पादचारी पुलाचा भाग कोसळला

By admin | Updated: April 10, 2015 00:15 IST

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्र. २/३ वरील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या कठड्याचा भाग गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळला

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्र. २/३ वरील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या कठड्याचा भाग गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळला. गर्दी कमी असल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सुरक्षा यंत्रणेनेही तातडीने या ठिकाणी येत येथून होणारी वर्दळ बाजूला केली. याचा लोकल वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. जेथे हा भाग खाली पडला, त्या ठिकाणी कोणीही उभे राहू नये, असे आवाहन करण्यात आले. रेल्वे सुरक्षादलाने या वेळी बंदोबस्त चोख ठेवला. (प्रतिनिधी)