Join us  

Mumbai Section 144: पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदीचा आदेश; ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 3:13 PM

Mumbai Section 144: पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी पुढील ९ दिवस शहरात कलम १४४ लागू केलं आहे.

Mumbai Section 144: पुण्यापाठोपाठ आता मुंबईतहीजमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी पुढील ९ दिवस शहरात कलम १४४ लागू केलं आहे. त्यामुळे पुढील ९ दिवस आता सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्यास बंदी आहे. मुंबई पोलिसांकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिसांच्या आदेशानुसार आता गणेशोत्सव काळात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल. यासोबतच राज्य सरकारनं जाहीर केलेल्या नियमावलीनुसार प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध करण्यात आली असल्यानं नागरिकांना दर्शनासाठी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

पुण्यात गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार

लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणपती बाप्पाचं ऑनलाइन दर्शन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंडळांकडून यंदा ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

पुण्यातही जमावबंदीपुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी खबरदारी म्ह्णून गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी (१४४ कलम) लागू करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच १० ते १९ सप्टेंबर या कालावधीसाठी हा आदेश लागू करण्यात आला असून उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पुणे शहर पोलिस सहायुक्त डॉ.  रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. त्याबरोबरच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून शहर पोलीस दलाकडून ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :जमावबंदीमुंबईगणेशोत्सव