Join us

हद्दपारी विरोधात सचिव

By admin | Updated: October 18, 2014 22:28 IST

निराधार आणि आपली बदनामी करणारी असल्याने आपण त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली आहे.

नंदा म्हात्रे उच्च न्यायालयात 
जयंत धुळप - अलिबाग
आपल्यावर कोणत्याही स्वरूपाचा गंभीर फौजदारी गुन्हा दाखल नाही. अनेक गंभीर गुन्हे दाखल होऊन, समाजातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याची कोणत्याही प्रकारे शक्यता नसताना, पेण उप विभागीय महसूल अधिकारी तथा पेण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आपल्यावर हद्दपारीची कारवाई केली. ती पूर्णत: निराधार आणि आपली बदनामी करणारी असल्याने आपण त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली आहे.
 
माहितीच्या अधिकारात मागितली माहिती
उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता आवश्यक कागदपत्रे आपणास मिळावीत, याकरिता आपण शुक्रवारी माहितीच्या अधिकारान्वये पेण उप विभागीय महसूल अधिकारी तथा पेण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे रीतसर अर्ज दाखल केला आहे. 
 
सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई 
कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणू शकतात, अशा व्यक्तींचा अहवाल पोलीस पाठवत असून त्यावर अंतिम आदेश उप विभागीय महसूल अधिकारी तथा दंडाधिका:यांकडून दिले जातात. त्याची अंमलबजावणी पोलीस करतात. त्यानुसारच नंदा राजेंद्र म्हात्रे व अन्य 74 जणांबाबत 
14 ते 19 ऑक्टोबर अशा सहा दिवसांकरिता हद्दपारीचे आदेश पेण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी निधी चौधरी यांनी दिले. 
 
राजकीय आकसापोटी कारवाई
कोणतेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल नसताना रायगड जिल्हा प्रशासनाने काँग्रेस आणि शेकापच्या प्रमुख सक्रि य कार्यकत्र्याना ‘कुख्यात गुंड’ अशी उपमा देऊन नाहक बदनाम केले आहे. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने भाजपाकडून आकसापोटी ही कारवाई करण्यात आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.