Join us

घराणेशाहीचा दुसरा अंक

By admin | Updated: April 20, 2015 01:14 IST

महापालिका निवडणुकीमध्ये अनेक विद्यमान नगरसेवक व नेत्यांची दुसरी पिढीही नशीब आजमावत आहे. अनेकांनी मुलगा, मुलगी व सुनांना निवडणुकीच्या रिंगणात

नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिका निवडणुकीमध्ये अनेक विद्यमान नगरसेवक व नेत्यांची दुसरी पिढीही नशीब आजमावत आहे. अनेकांनी मुलगा, मुलगी व सुनांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. दुसऱ्या पिढीचा विजय सुकर व्हावा यासाठी नेते मंंडळींनी स्वत:चा अनुभव पणाला लावला आहे. नवी मुंबईच्या राजकारणामध्ये घराणेशाहीवरून सर्वच राजकीय पक्षांनी गणेश नाईकांवर अनेक वेळा टीका केली आहे. नाईकांनी महापालिका निवडणुकीच्या पहिल्या निवडणुकीमध्येच मुलगा संजीव नाईकांना उमेदवारी देवून महापौर बनविले. यानंतर तिसऱ्या व चौथ्या निवडणुकीमध्ये मुलगा संदीप नाईक व पुतण्या सागर नाईक यांना राजकारणामध्ये उतरविले. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. परंतु, ज्यांनी टीका केली त्यांनीही आता स्वत:च्या मुलांच्या राजकारणाचा श्रीगणेशा पालिका निवडणुकीपासून करण्यास सुरवात केली आहे. ऐरोलीत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचा मुलगा ममीत चौगुले निवडणूक लढवत आहे. एम. के. मढवी यांचा मुलगा करण मढवी, घणसोलीत कमलताई पाटील यांचा मुलगा व सून निवडणूक रिंगणात आहेत. माजी महापौर तुकाराम नाईक यांच्या निधनानंतर मुलगा वैभव नाईक राजकारणात आले असून, पालिका निवडणुकीत सून व मुलगी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. घराणेशाहीवर टीका करणाऱ्या विठ्ठल मोरे यांची सूनही वाशीतून निवडणूक लढत आहे. काँगे्रस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पुतण्याची पत्नीही निवडणूक लढवत आहे. तुर्भेमधील पाटील परिवारातील विवेक पाटील व शुभांगी पाटील यांनी यापूर्वीच राजकारणात प्रवेश केला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना दुसऱ्या पिढीसाठी प्रचार करावा लागत आहे.