मुंबई : निवडक कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्यामुळे शेअर बाजारात गुरुवारी सलग दुस:या दिवशी तेजीचे वातावरण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 53 अंकांनी वाढून 28,438.91 अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 18 अंकांनी वाढून 8,494.20 अंकांनी बंद झाला.
2 डिसेंबर रोजी रिझव्र्ह बँकेकडून पतधोरणाचा आढावा जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांत सावधपणाचे वातावरण दिसून आले. खरेदी सुरू होती. तथापि, ती व्यापक नव्हती. काही मोजक्या समभागांपुरतीच ती मर्यादित होती.
सेन्सेक्समधील इन्फोसिस, एचयूल, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, भेल, एमअँडएम, बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज लॅब आणि हिंदाल्को या कंपन्यांनी बाजाराला वर नेले. दुस:या दर्जाच्या कंपन्यांतील समभागांत चांगली खरेदी दिसून आली. किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपन्यांकडे मोर्चा वळविलेला होता. बीएसई स्मॉलकॅप आणि बीएसई मीडकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.55 टक्के आणि 0.51 टक्के वाढले. 30 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सची सकाळची सुरुवात चांगली राहिली. उघडला तेव्हा तो स्थिर होता. नंतर तो वर चढला. जवळपास 190 अंकांची वाढ त्याने मिळविली होती. सत्रअखेर्पयत तो थोडा खाली आला. 52.72 अंकांची वाढ नोंदवून 28,438.91 अंकांवर बंद झाला. ही वाढ 0.19 टक्के आहे.
व्यापक आधार असलेला 50 कंपन्यांच्या शेअर्सचा सीएनएक्स निफ्टी 18.45 अंकांनी अथवा 0.22 अंकांनी वाढून 8,494.20 अंकांवर बंद झाला. ब्रोकर्सनी सांगितले की, महिनाअखेरचे वातावरण, तसेच 2 डिसेंबर रोजी जाहीर होणार असलेला रिझव्र्ह बँकेचा आढावा यामुळे गुंतवणूकदारांत फारसा उत्साह दिसला नाही. तथापि, आयटी, ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रतील कंपन्यांत खरेदी झाल्यामुळे बाजाराला तारले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. कच्चे तेल 4 वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेले आहे. याचा परिणाम म्हणून भारताचा व्यापारी तोटा कमी होणार आहे. भारतात वापरल्या जाणा:या खनिज तेलापैकी 80 टक्के तेल आयात केले जाते. शेअर बाजाराच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार काल विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 181.46 कोटी रुपयांची शेअर खरेदी केली.
जागतिक बाजारांपैकी आशियायी बाजारांत संमिश्र कल दिसून आला. चीन, दक्षिण कोरिया, तैवान येथील बाजार वाढीसह बंद झाले. या उलट हाँगकाँग, जपान आणि सिंगापूर येथील बाजार घसरले.
युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रत खरेदीचा जोर दिसून आला. डॅक्स 0.70 टक्क्यांनी वर होता. एफटीएसईही 0.23 टक्क्यांनी वर चालला होता. फ्रान्सचा सीएसी मात्र आज बंद होता. तत्पूर्वी काल अमेरिकी शेअर बाजारही तेजीत होते.
घसरण सोसावी लागलेल्या कंपन्यांत टाटा स्टील, सेसा स्टरलाईट, ओएनजीसी, एलअँडटी, आयटीसी आणि मारुती सुझुकी यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
4सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 30 कंपन्यांपैकी 16 कंपन्यांचे शेअर्स वाढले. 14 कंपन्यांचे शेअर्स कोसळले.
4वाढ मिळविणा:या कंपन्यांत भेल, एचयूएल, टाटा पॉवर, हिंदाल्को, इन्फोसिस, एमअँडएम, बजाज ऑटो, सिप्ला आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचा समावेश होता.
4बाजाराचा एकूण व्याप सकारात्मक राहिला. 1,570 कंपन्या लाभात राहिल्या. 1,353 कंपन्यांना तोटा सहन करावा लागला. 138 कंपन्या आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिल्या.
4 बाजारातील एकूण उलाढाल 3,351.02 कोटी रुपये झाली. आदल्या दिवशी ती 2,973,.91 कोटी होती.