मुंबई : पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी गुरूवारी जाहीर झाली. त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांची यादी अद्याप नव्वदीवर अडकली असून पारंपरिक अभ्यासक्रमांची यादी मात्र खालावली आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत यंदाही विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. बीएफ आणि बीएमएफ अशा वेगळ््या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा ओढा दिसून आला. त्यामुळे नव्वद टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही नामांकित महाविद्यालयात या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळण्याची धूसर शक्यता आहे.मुंबईतील काही महाविद्यालयांतील शाखानिहाय कट आॅफ लिस्ट साठ्येकला - ३८.९३विज्ञान - ५९.१६वाणिज्य - ६४.१६रु ईया कॉलेजकला - ८८विज्ञान - ७१.०८बीएससी सीएस - ७४.४बीएससी बायो अनलेटीकल - ६१बीएमएम (इंग्रजी) -कला - ८४.१७वाणिज्य - ८७.६०विज्ञान - ८६.४०बीएमएम (मराठी)वाणिज्य - ५०.३३केळकर कॉलेज विज्ञान - ६३.३८वाणिज्य - ८६.७७बीएससी आयटी (गणित) - ७६बीएससी बायो टेक्नोलॉजी ७७.२३बीबीआय - ८०बॅफ - ८५.३८बीएमएम -कला - ७५.३८विज्ञान - ७६.८०बीएमएस कला - ६१.५४विज्ञान - ७२.७७वाणिज्य - ८६.३१पोदारवाणिज्य - ९३.२३बीएमएस -कला - ७२.७६वाणिज्य - ९३.४ विज्ञान - ८३.५४