Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांताक्रुझ दुहेरी हत्याकांड चौघांना अटक

By admin | Updated: July 29, 2016 03:42 IST

सांताक्रुझ येथे बुधवारी सायंकाळी गुलाम अहमद अब्बास अली शेख उर्फ बाबुभाई आणि नदीम खात्री या दोघांवर गोळीबार आणि चॉपरने हल्ला करून झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावत

मुंबई: सांताक्रुझ येथे बुधवारी सायंकाळी गुलाम अहमद अब्बास अली शेख उर्फ बाबुभाई आणि नदीम खात्री या दोघांवर गोळीबार आणि चॉपरने हल्ला करून झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावत अवघ्या आठ तासात सांताक्रुझ पोलिसांनी गुरुवारी चौघांच्या मुसक्या आवळल्या, ज्यात दोघे अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे.मोहसीन बेहलीम, सचिन पवार, सोनू दत्ता हजारे उर्फ अरबाझ आणि संजोग तीनघुटे अशी अटक आरोपींची नावे आहेत. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचेच प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.बेहलीम हा सांताक्रुझ तर उर्वरित तिघे मुलुंडचे राहणारे आहेत. खुनाच्या आरोपात कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा बेहलीम गेल्या पंचवीस दिवसांपासून पॅरॉलवर बाहेर होता. तर पवार याने एका पेट्रोलपंपवर दरोडा टाकल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असून, त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. यांचा अजून एक साथी फरार असून घटनास्थळाची पाहणी करून, त्याची माहिती अन्य चार आरोपींना पोहोचविण्याचा आरोप त्याच्यावर आहे. यांनी हत्येसाठी वापरलेली शस्त्रदेखील पोलिसांनी हस्तगत केली आहेत.