Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीवूड रेल्वे स्थानकातील खिडकी बंद

By admin | Updated: June 9, 2014 02:05 IST

सीवूड रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूला तिकीट खिडकी नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास दूर करण्यासाठी काही महिन्यापूर्वी तिकीट खिडकी सुरू करण्यात आली होती.

नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूला तिकीट खिडकी नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास दूर करण्यासाठी काही महिन्यापूर्वी तिकीट खिडकी सुरू करण्यात आली होती. मात्र एकाच महिन्यामध्ये तिकीट खिडकी पुन्हा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना पुन्हा नाहक त्रास सहन करावा लागतो.सिवूड रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे काम सुरू आहे. सदर काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांसाठी एकाच बाजूला तिकीट खिडकी, वाहनतळ, प्रसाधानगृह व इतर सुविधा ठेकेदाराकडून उपलब्ध करून देण्याचे काम सिडको व रेल्वे प्रशासनाचे आहे. येथे पश्चिम बाजूला तिकीट खिडकी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु पूर्व बाजूला काहीच सुविधा नव्हत्या. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना पश्चिमेला वळसा मारावा लागत होता. म्हणून प्रवाशांच्या मागणीनुसार पूर्वेस एक तिकीट खिडकी सुरू करण्यात आली होती. मात्र एकाच महिन्याभरात ती तिकीट खिडकी बंद करण्यात आली आहे. ही तिकीट खिडकी बंद असल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पश्चिमेकडील खिडकी गाठावी लागत आहे. (प्रतिनिधी)