Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटमुळे शोध

By admin | Updated: May 7, 2016 02:21 IST

चांदिवली परिसरात एका अल्पवयीन मुलाकडून मजुरी करवून घेतली जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटवर प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे

मुंबई : चांदिवली परिसरात एका अल्पवयीन मुलाकडून मजुरी करवून घेतली जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटवर प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेपाळच्या १६ वर्षीय मुलाची सुटका केली. सध्या त्याला डोंगरी येथील बालगृहात ठेवण्यात आले आहे.पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंंटवर १ मे रोजी चांदिवली येथील म्हाडा कॉलनीत एका मुलाला कामावर ठेवून त्याची पिळवणूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जापू शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे छापा टाकला. मुलाकडून दिवसरात्र काम करून घेतले जात होते. पोलिसाने मुलाला ताब्यात घेत हॉटेलचालकाविरुद्ध साकीनाका पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.