Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूखच्या सीएला ईडीने बोलावले

By admin | Updated: November 19, 2015 01:54 IST

आयपीएल स्पर्धेचे लक्षावधी समभाग (शेअर्स) अत्यंत कमी भावात विकल्याबद्दलचा खुलासा समाधानकारक नसल्यामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेता शाहरूख खानच्या

- डिप्पी वांकाणी,  मुंबईआयपीएल स्पर्धेचे लक्षावधी समभाग (शेअर्स) अत्यंत कमी भावात विकल्याबद्दलचा खुलासा समाधानकारक नसल्यामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेता शाहरूख खानच्या (एसआरके) चार्टर्ड अकाउंटटला बोलावले आहे. कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) आयपीएलमध्ये फ्रँचाइसी घेतली होती. शाहरुखची या कंपनीत भागीदारी आहे. केकेआरचे ५० लाख शेअर्स मॉरिशस येथील कंपनीला प्रत्येकी १० रुपये या भावाने विकले. वास्तविक या शेअर्सचा भाव त्यावेळी किती तरी जास्त होता. या व्यवहारासाठी एसआरकेने आझगावकर यांना चार्टर्ड अकाउंटंट म्हणून नेमले होते. ईडीतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आझगावकर यांनी केलेल्या खुलाशाने समाधान न झाल्यास ईडी शाहरूखलाही नोटीस बजावणार आहे. याच प्रकरणात ईडीने एसआरकेची ११ नोव्हेंबर रोजी तीन तास चौकशी केली होती.हे शेअर्स अभिनेत्री जुही चावला हिचे पती जय मेहता यांचे वडील महेंद्र मेहता यांची मॉरीशस येथील कंपनी सी आयलँड इन्व्हेस्टमेंटला कमी किमतीत विकल्याचा संशय आहे. आम्ही केलेल्या चौकशीत शाहरूखने सहकार्य केले, परंतु तो शेअर्सच्या भावाबद्दल खुलासा करू शकला नाही, असे हा अधिकारी म्हणाला.खान म्हणाला की, त्याने त्या व्यवहारासाठी सीए आझगावकर यांची सेवा घेतली होती. आता आम्ही आझगावकर यांना बोलावले असून त्यांनाही हेच प्रश्न विचारले जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले. खुलासा आला नाही तर शाहरूखला कारणे नोटीस देऊ, असेही त्याने सांगितले.शेअर्सची त्यावेळी नेमकी किंमत किती होती हे ठरविण्यासाठी चोक्सी अँड चोक्सी कंपनीची नियुक्ती केली होती. अभ्यासानुसार शेअर्सची किंमत सात ते आठ पट कमी दाखविण्यात आली. प्रथम दर्शनी फेमाचे उल्लंघन झाल्याचा आम्हाला संशय आहे, असे हा अधिकारी म्हणाला. शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने आयपीएलसाठी फ्रँचाईसी म्हणून कोलकाता नाईट रायडर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना सुरवातीलाच १० हजार शेअर्स घेऊन केली होती. जुही चावला हिने नंतर ४० लाख शेअर्स इशू केले आणि महेंद्र मेहतांच्या कंपनीने १० रुपये शेअर भावाने ५० लाख शेअर्स इश्शू केले. चावलानेदेखील तिच्याकडील ४० लाख शेअर्स मेहतांच्या कंपनीला १० रुपये शेअर या भावाने हस्तांतरित केले. सध्या केकेआरचे दोन कोटी शेअर्स आहेत. खानकडे १.१ कोटी तर मॉरीशसमध्ये मेहताच्या कंपनीच्या मालकीचे ९० लाख शेअर्स आहेत.