Join us

स्कॉर्पियोचा क्रमांक निघाला नीता अंबानी यांच्या लीड कारचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:07 IST

स्कॉर्पियोमधून आणखीन ४ बनावट वाहन क्रमांककट पूर्वनियोजितस्कॉर्पियोचा क्रमांक निघाला नीता अंबानी यांच्या लीड कारचाकट पूर्वनियोजित; आणखी ...

स्कॉर्पियोमधून आणखीन ४ बनावट वाहन क्रमांक

कट पूर्वनियोजित

स्कॉर्पियोचा क्रमांक निघाला नीता अंबानी यांच्या लीड कारचा

कट पूर्वनियोजित; आणखी दोन बनावट नंबर प्लेट्ससह चार प्लेट घेतल्या कारमधून ताब्यात

कट पूर्वनियोजित

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : संशयास्पदरीत्या आढळलेल्या स्कॉर्पियोवर वापरण्यात आलेला क्रमांक नीता अंबानी यांच्या ताफ्यातील लीड कार असलेल्या रेंज रोव्हर वाहनाचा आहे. त्याशिवाय रिलायन्स ग्रुपसंबंधित आणखी दोन बनावट नंबर प्लेट्ससह चार प्लेट कारमधून ताब्यात घेतल्या आहे. यात अन्य दोन वाहन क्रमांक ठाणे आणि मुंबईतील रहिवाशांची आहेत. आरोपींनी कार चोरीच्या घटनेआधीपासून रेकी करत त्यांच्या वाहनांची पाहणी केली. त्यानंतर वाहन चोरी केल्यानंतर वाहन तेथे पार्क केले. आरोपींची ॲन्टालिया येथील निवासस्थानाबाहेरील स्कॉर्पियो जप्त केली तेव्हा ती क्लॅम्प केलेल्या अवस्थेत होती.

...........................