Join us

लक्ष्मण लोंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विज्ञानकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : साहित्यिक आणि विज्ञानलेखक लक्ष्मण लोंढे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त विज्ञान कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : साहित्यिक आणि विज्ञानलेखक लक्ष्मण लोंढे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त विज्ञान कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोंढे कुटुंबीय आणि माहीम सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धकांची कथा स्वलिखित असावी. एका व्यक्तीला एकच कथा पाठवता येईल. कथा आधी कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध झालेली नसावी. तसेच इतर कोणत्याही स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त साहित्यकृती नसावी.

अवैज्ञानिक कथा किंवा फॅन्टसीवर आधारित कथा स्पर्धेतून बाद केली जाईल. कथेची शब्दमर्यादा तीन हजार एवढी असावी तसेच ती पीडीएफ फॉरमॅटमध्ये mahimvachnalaya@gmail.com येथे मेल करावी. कथा पाठविण्याची अंतिम तारीख ७ जुलै असून पारितोषिक वितरण समारंभ ६ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १० हजार द्वितीय पारितोषिक सात हजार व तृतीय पारितोषिक पाच हजार असणार आहे.

...............................