Join us

विज्ञान अधिवेशन दूरदृष्यमाध्यमाद्वारे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंचावन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन १३ ते १७ डिसेंबर या काळात मुंबईहून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पंचावन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन १३ ते १७ डिसेंबर या काळात मुंबईहून दूरदृष्यमाध्यमाद्वारे साजरे होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षपद नवी दिल्ली येथील काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक डॉ. शेखर मांडे भूषवणार आहेत. या अधिवेशनाचे उद्‌घाटन १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

समारंभात लसनिर्मिती या विषयावर होणाऱ्या अध्यक्षीय भाषणाशिवाय, तासकर लघुउधोजक पुरस्कार, विज्ञान एकांकिका पुरस्कार, विज्ञानरंजन कथा पुरस्कार, गोडबोले गणित पुरस्कार, महाविद्यालयीन मुलांच्या संशोधनाचे पुरस्कार, वेध-२०३५ पुरस्कार, मराठी विज्ञान परिषदेतून पीएचडी केलेल्या दीपंकर बिस्वास या पहिल्या विद्यार्थ्याचा सन्मान आणि सन्मानकऱ्यांचा सन्मान होईल. अध्यक्षीय भाषणानंतर उद्‌घाटन कार्यक्रम दुपारी १.३० वाजता संपेल. अधिक माहितीसाठी मराठी विज्ञान परिषदेशी संपर्क साधावा.