Join us

परेलमध्ये स्कूल व्हॅनला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 06:08 IST

वरळी येथील ग्रीन लॉन्स शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅनने मंगळवारी दुपारच्या सुमारास पेट घेतला.

मुंबई : वरळी येथील ग्रीन लॉन्स शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅनने मंगळवारी दुपारच्या सुमारास पेट घेतला. व्हॅन चालक आणि कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत विद्यार्थ्यांना व्हॅनमधून बाहेर काढल्याने जीवितहानी झाली नाही.परेल पश्चिमेकडील एस. एल. मटकर मार्गावर दुपारच्या सुमारास व्हॅन थांबली. अचानक व्हॅनच्या खालील बाजूस धूर येऊ लागला. चालक आणि मटकर मार्गावरील वाहतूक पोलिसांनी व्हॅनमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. यानंतर काही मिनिटांनी व्हॅनने पेट घेतला.