Join us

शाळेलाच गेले तडे; पाणी नाही

By admin | Updated: April 11, 2015 22:33 IST

उपवन तलावाजवळील कोकणीपाडा येथे असलेली शाळा क्र मांक ४८ ही कोकणीपाडा, वडारवाडी, गावंडबाग परिसरातील शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.

नामदेव पाषाणकर ल्ल घोडबंदरउपवन तलावाजवळील कोकणीपाडा येथे असलेली शाळा क्र मांक ४८ ही कोकणीपाडा, वडारवाडी, गावंडबाग परिसरातील शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. शाळेच्या चार खोल्यातून इयत्ता १ ली ते ७ वीचे वर्गांसाठी चार शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शाळेच्या संरक्षणासाठी दोन सुरक्षारक्षक नेमले असले तरी शाळेला संरक्षक भिंत नसल्याने रात्रीच्या सुमारास बाहेरील व्यक्तींचा वावर येथे असतो. टीकुजीनिवाडी जवळ असलेल्या दुसऱ्या कोकणीपाडा येथील शाळा क्र मांक ५० मध्ये सापांचा वावर असतो. शाळा क्र मांक ४८ चा एकूण पट अवघा १०१ आहे. मुख्याध्यापक नसलेल्या या शाळेवर चार शिक्षक आहेत. दुपारच्या सत्रात एका वर्गात दोन इयत्तांचे वर्ग भरतात.शौचालये पाच पण पाणीच नाहीदुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हद्दीत असलेल्या शाळा क्र मांक ५० ला पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. येथे आदिवासी वस्तीतील मुले येतात. शाळेत पाच शौचालय आहेत परंतु पाण्याची सुविधा नाही. वस्तीतल्या नळावरील रहिवासी पाणी भरून झाले की तेथून पाणी आणून ड्रममध्ये साठवले जाते. सकाळच्या सत्रात चार वर्गातून इयत्ता १ ली ते ८ वी च्या मुलांना शिकवण्यासाठी चार शिक्षक आहेत. पट संख्येनुसार दोन शिक्षक कमी आहेत. शाळेला आॅफीस नाही म्हणून शाळेतच कामकाज केले जात आहे. इमारतीला तडे गेले असून त्यातून रात्री साप वर्गात येऊन बसतात. हिच खरी शिक्षण सेवा५वी ते ८ वी च्या मुलांना गणित, इंग्रजी विषय सोपे जावे, म्हणून रमा ताम्हणकर ही महिला एक तास मोफत शिकवणी घेते, तसेच दुर्गा कुरकुटे ही एम. ए. झालेली मुलगी सध्या नोकरी नाही म्हणून सराव होण्यासाठी मुळाक्षरे, अंकगणित शिकवते.