Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:09 IST

मुंबई : ट्रायम्फंट इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशनच्या टेस्ट प्रिपरेशन इन्स्टिट्यूटने २१ ऑगस्ट रोजी फ्री ऑल इंडिया मॉक कॅट एक्झाम ...

मुंबई : ट्रायम्फंट इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशनच्या टेस्ट प्रिपरेशन इन्स्टिट्यूटने २१ ऑगस्ट रोजी फ्री ऑल इंडिया मॉक कॅट एक्झाम (शिष्यवृत्ती चाचणी)चे आयोजन केले आहे. ही विनामूल्य ऑल इंडिया मॉक कॉट एक्झाम नॉन इनव्हिजिलेटेड मोडमध्ये उपलब्ध आहे, याचा अर्थ विद्यार्थी आता आपल्या घरातूनच परीक्षा देऊ शकतात. विनामूल्य आयोजित ए.आय.एम. कॅट्समधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे सवलती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील.

-------------------

-------------------

प्रश्नमंजूषा स्पर्धा

मुंबई : आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागाने प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी आकाशवाणीच्या बातमीपत्रातून दर सोमवारी एक प्रश्न विचारला जाईल. स्पर्धकांनी या प्रश्नाचे उत्तर आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागाकडे ई-मेलद्वारा पाठवायचे आहे. सर्वप्रथम योग्य उत्तर देणाऱ्या यशस्वी स्पर्धकाचे नाव शुक्रवारच्या बातमीपत्रातून प्रसारित करण्यात येतील. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरही फोटोसह हे प्रकाशित करण्यात येईल. प्रशस्तीपत्रक देऊन यशस्वी स्पर्धकाचा सन्मान करण्यात येईल.

-------------------