Join us  

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती, दोन कोटी रूपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 3:22 AM

आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघाने फाउंडेशन फॉर एक्सलन्ससोबत संयुक्तरीत्या आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी नवी शिष्यवृत्ती सुरू केली आहे.

मुंबई : आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघाने फाउंडेशन फॉर एक्सलन्ससोबत संयुक्तरीत्या आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी नवी शिष्यवृत्ती सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीनुसार येत्या ४ वर्षांत आयआयटीचे माजी विद्यार्थी रूर्इंतन मेहता २ लाख अमेरिकन डॉलर (१.२७ कोटी रूपये)ची मदत करतील. आयआयटीमध्ये शिकणाºया व आयआयटीमध्ये शिकण्याची इच्छा असूनही, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाºया विद्यार्थ्यांसाठी या पैशांचा वापर करण्यात येईल, असे आयआयटीच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले आहे. नुकतेच आयआयटी मुंबई येथे आयोजित परिषदेमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली.मागील ९ वर्षांपासून आयआयटीच्या माजी विद्यार्थी संघातर्फे दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीच्या फायनान्शिअल एड प्रोग्रामअंतर्गत (एफएपी) नवी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येईल. मागील ९ वर्षांत या प्रोग्रामअंतर्गत ८४० गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. या शिष्यवृत्तींसाठी तब्बल ७.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. एफएपीअंतर्गत पदवी व उच्च पदवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, खानावळ शुल्क आणि नोंदणी शुल्क भरले जाते. राजस्थान राज्यातील एका खेड्यात राहणाºया प्रेम पटेल (२०) या केमिकल इंजिनीअरिंगच्या तिसºया वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला, या शिष्यवृत्तीचा सर्वप्रथम लाभ मिळाल्याचे आयआयटीच्या जनसंपर्क विभागाने सांगितले. रूर्इंतन मेहता हे १९७० साली आयआयटी मुंबईमधून पदवीधर झाले. त्यांनी आतापर्यंत संस्थेसोबत विविध कामे करण्यासाठी, १ मिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षाही जास्त पैसे विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत. आयआयटीच्या स्टुडंट अफेअर्सचे डीन सुम्यो मुखर्जी म्हणाले की, ‘कोणत्याही विद्यार्थ्याला पैशांअभावी शिक्षण थांबवावे लागू नये, हे आयआयटी मुंबईचे धोरण संस्थेने कायम ठेवले आहे.’

टॅग्स :आयआयटी मुंबई