मुंबई : एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या स्कॅनिया कंपनीच्या बसची चाचणी दादर-पुणे मार्गावर सुरू आहे. या बसला चांगला प्रतिसाद मिळत असून याच कंपनीच्या अन्य बसेसही टप्प्याटप्प्यात सुरू केल्या जातील, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले. मुंबई एअरपोर्ट ते पुणे मार्गावरही या बसची सेवा सुरू करण्याचा विचार आहे. या बसमध्ये प्रवाशांना खान-पानउपलब्ध व्हावे यासाठी एक पॅन्ट्रीही उपलब्ध करणार असून, त्यासाठी बसमधील सजावटीत बदल केले जाणार आहेत.
मुंबई-पुणे मार्गावर ‘स्कॅनिया’ची चाचणी
By admin | Updated: July 6, 2015 03:21 IST