Join us  

उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेजेस आता उमेदवारांच्या प्रोफाइलवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 4:00 AM

उमेदवाराला मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालासाठी गृहीत धरलेले एकूण गुण, उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गासाठीच्या गुणांची किमान सीमांकन रेषा अशी एकूण माहिती दिली जाणार आहे.

मुंबई / पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) आयोजित केल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या सर्व परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता पेपर तपासणीनंतर मिळालेल्या गुणांसह मूळ उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेजेस उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइलवर उपलब्ध करून देणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे.उमेदवाराला मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालासाठी गृहीत धरलेले एकूण गुण, उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गासाठीच्या गुणांची किमान सीमांकन रेषा अशी एकूण माहिती दिली जाणार आहे.परीक्षेत उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येते. त्यापैकी भाग-१ (मूळ प्रत) हा परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येतो. तर भाग-२ (कार्बन प्रत) परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारास दिली. एमपीएससीकडून परीक्षा होताच काही दिवसांनंतर उत्तर पत्रिका जाहीर केली जाते. त्यावरुन उमेदवारांना कार्बन प्रतीवर गुणांचा अंदाज बांधता येत होता. पण मूळ प्रत पाहता येत नव्हती. आता मात्र ती पाहता येईल....यांना निर्णय लागूनियमानुसार उमेदवाराने परीक्षेवेळी त्यांची उत्तरे ही उत्तरपत्रिकेवर तसेच मलपृष्ठावर सविस्तरपणे दिलेल्या सूचनांनुसार नोंदविणे (वर्तूळ छायांकित करणे) गरजेचे आहे. उत्तरपत्रिकेच्या भाग-२ (कार्बन प्रत) वरून उमेदवारास त्याने परीक्षेमध्ये छायांकित केलेली उत्तरे आयोगाकडून प्रसिद्ध केलेल्या उत्तरतालिकेवरून पडताळून पाहता येतात. १ आॅक्टोबर २०२० नंतर आयोजित होणाºया सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांसाठी हा निर्णय लागू राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.