मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश पूर्व नोंदणीची मुदत संपली असून, मुंबई मंडळातंर्गत २ लाख २४ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या नजरा आता पहिल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीकडे लागून राहिल्या असून, येत्या सोमवारी (दि. २०) ही यादी जाहीर होणार आहे.मे महिन्यापासून सुरु झालेल्या अकरावी आॅनलाईन प्रवेश पूर्व नोंदणीची मुदत शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत होती. अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश पूर्व नोंदणी अनिवार्य करण्यात आले होती. शाळांनी अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना पसंती अर्ज आॅनलाईन भरणे देखील अनिवार्य होते. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षी २ लाख २४ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर पसंती अर्ज २ लाख १८ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी भरले आहेत. पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी- २० जून (सायंकाळी ५ वाजता) आॅनलाईन सुधारणा- २१ ते २२ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)पहिली गुणवत्ता यादी- २७ जून (सायं. ५ वाजता)शुल्क भरणी -२८,२९,३० जून (सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत)दुसरी गुणवत्ता यादी -४ जुलै (सायं. ५ वाजता)शुल्क भरणी- ५,७,८ जुलै( सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत)तिसरी गुणवत्ता यादी- १३ जुलै (सायं. ५ वाजता) शुल्क भरणी- १४ जुलै (सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत)
अकरावीसाठी सव्वादोन लाख अर्ज
By admin | Updated: June 19, 2016 03:03 IST