Join us
Daily Top 2Weekly Top 5

भांडूप येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृह स्थलांतरीत

By जयंत होवाळ | Updated: January 16, 2024 20:15 IST

इमारतीच्या दुरुस्ती कामांमुळे नजीकच्या परिसरात स्थलांतर 

मुंबई :मुंबई महानगरपालिकेच्या 'एस' विभागातील भांडूप मधील  सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहाच्या दुरूस्तीचे काम  हाती घेण्यात आल्यामुळे प्रसूतिगृह दुरूस्तीच्या कालावधी करिता बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी या प्रसूतिगृहाचे स्थलांतर हे भांडूप परिसरातच असणाऱ्या सुषमा स्वराज प्रसूतिगृह, लालबहादूर शास्त्री मार्ग  येथे करण्यात आले आहे. प्रसूतीगृहाच्या इमारतीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत सुषमा स्वराज प्रसूतीगृह येथूनच आवश्यक त्या वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतीगृहाची दुरूस्ती करण्याबाबतचा निर्णय  महानगरपालिका प्रशासनामार्फत घेण्यात आला होता.