Join us
Daily Top 2Weekly Top 5

बुडणाऱ्या प्रेमी युगुलाला वाचविले

By admin | Updated: March 15, 2016 00:45 IST

मालाड येथील अक्सा बीच येथे बुडत असलेल्या प्रेमी युगुलाला वाचविण्यात तेथील जीवरक्षकांना यश आले आहे. दोघांचीही या संकटातून सुखरूप सुटका झाल्याने त्यांनी या जीवरक्षकांना धन्यवाद दिले.

मुंबई : मालाड येथील अक्सा बीच येथे बुडत असलेल्या प्रेमी युगुलाला वाचविण्यात तेथील जीवरक्षकांना यश आले आहे. दोघांचीही या संकटातून सुखरूप सुटका झाल्याने त्यांनी या जीवरक्षकांना धन्यवाद दिले.पश्चिम उपनगरातील एक प्रेमी युगूल सोमवारी दुपारी मालाड येथील अक्सा बीचमधील खडकात गप्पा मारत बसले होते. दुपारी पावणेएकच्या सुमारास अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ते पाण्यात ओढले गेले. बचावासाठी त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा तेथे तैनात असलेल्या जीवरक्षक नथुराम सूर्यवंशी, समीर कोळी, स्वतेज कोळंबकर यांनी १५ फूट खोल पाण्यात उड्या घेऊन या युगुलास बाहेर काढले. (प्रतिनिधी)