Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-नाट्यशोध’ची शनिवारी फायनल

By admin | Updated: May 16, 2014 01:09 IST

‘अस्तित्व’ आणि ‘मुंबई थिएटर गाइड’ या संस्थांनी सुरू केलेल्या ई-नाट्यशोध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी १७ मे रोजी रंगणार आहे.

मुंबई : ‘अस्तित्व’ आणि ‘मुंबई थिएटर गाइड’ या संस्थांनी सुरू केलेल्या ई-नाट्यशोध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी १७ मे रोजी रंगणार आहे. गिरगाव येथील साहित्य संघात सायंकाळी ७.४५ ते रात्री ११ या वेळेत ती पार पडणार आहे. एकांकिकांचे जतन व्हावे, त्यांचे रेकॉर्ड्स ठेवण्याची सवय व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली. एकूण ३१ प्रवेशिकांमधून २० एकांकिका या वेळी प्रेक्षक आणि परीक्षकांच्या निवडीसाठी मुंबई थिएटर गाइडतर्फे व यू ट्यूबच्या सहयोगाने आॅनलाइन सादर करण्यात आल्या. त्यापैकी सहा एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. ई-नाट्यशोध एकांकिका स्पर्धेतून निवडलेल्या तीन सर्वोत्कृष्ट कलाकृती थिएटरमध्ये सादर करण्याची संधी कलाकारांना मिळणार आहे. तसेच ‘व्ह्यूअरशिप’च्या आकडेवारीतून जमा होणारे ५० टक्के मानधन यू ट्यूब त्या एकांकिकांच्या टीमला देणार आहे. (प्रतिनिधी)