लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : नेवाळी आंदोलनप्रकरणी सरपंच चैनू जाधव यांना अटक केली आहे. त्यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आंदोलनकर्त्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवणार आहे. नेवाळी येथील विमानतळाच्या जागेवर संरक्षण भिंत बांधायला शेतकऱ्यांनी विरोध केला होता. मागील आठवड्यात ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांच्या तसेच खाजगी गाड्या पेटवून दिल्या. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवर हल्ला केला होता. जाळपोळ करत आंदोलनाचा भडका उडवून दिला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गावात कोम्बिंग आॅपरेशन करून आंदोेलनकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. या घटनेनंतर नेवाळी गावात तणावाचे वातावरण पसरले होते. मानपाडा पोलिसांनी २५, तर हिललाइन पोलिसांनी २८ अशी एकूण ५८ जणांना अटक केली आहे. यामध्ये नेवाळी गावाचे सरपंच चैनू जाधव यांचा समावेश आहे. या अटकसत्रात आणखी काय घडामोडी घडतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नेवाळी आंदोलनप्रकरणी सरपंचाला अटक
By admin | Updated: July 1, 2017 07:41 IST