Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारसनचा पाणीप्रश्न कायमचा निकालात

By admin | Updated: June 14, 2015 23:19 IST

दोन बोअरवेल व सुमारे दोन कोटी रूपयांची पाणी योजना असतानाही खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सारसन ग्रामस्थांना पिण्याचे

अमोल पाटील, खालापूरदोन बोअरवेल व सुमारे दोन कोटी रूपयांची पाणी योजना असतानाही खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सारसन ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत होते. या संदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेत भारत निर्माण योजनेची अपूर्ण पाणी योजना पूर्ण करत पाणी पुरवठा सुरू केल्याने सारसनकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघाला आहे. यामुळे ग्रामस्थ समाधानी आहेत.खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सारसनमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थ व महिलांना वणवण करावी लागत होती. अनेक ग्रामस्थ पिण्याचे पाणी विकत घेत असल्याचे चित्र होते. सारसन गावाला दोन बोअरवेलद्वारे पाणी पुरवठा केला जात होता मात्र हे पाणी दूषित झाल्याने पिण्यायोग्य नव्हते. साजगाव ग्रामपंचायतीने सुमारे दोन कोटी रूपये खर्च करून तयार केलेली पाणी योजनाही अर्धवटच असल्याने ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत होते. दूरवर पायपीट करून डोक्यावरून, वाहनांमधून पाणी आणावे लागत होते.पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असतानाही ग्रामपंचायतीचे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्र ारीही केल्या होत्या मात्र या तक्र ारींची दखलही न घेणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने या संदर्भातील वृत्त विविध वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ दखल घेत रखडलेल्या पाणी योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू केला आहे. पाणी योजनेचा पुरवठा सुरू झाल्याने सारसन ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघाला असून, ग्रामस्थांकडून लोकमतचे आभार मानले जात आहेत.