Join us

सराईत चोर गजाआड

By admin | Updated: November 9, 2015 03:20 IST

गर्दीचे ठिकाणे, बस तसेच लोकलमध्ये असलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत पाकीट आणि मोबाइल चोरी करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी गजाआड केले आहे

मुंबई : गर्दीचे ठिकाणे, बस तसेच लोकलमध्ये असलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत पाकीट आणि मोबाइल चोरी करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी गजाआड केले आहे. सुरेश चव्हाण ऊर्फ सूर्या असे आरोपीचे नाव असून, तो अभिलेखावरील आरोपी आहे.पवईतील सतर्क तरुणांनी सूर्या नावाच्या सराईत मोबाइल व पाकीटमार चोराच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पवई आयआयटी मार्केट जंक्शनजवळील बसथांब्यावर सूर्या चोरीच्या उद्देशाने थांबला होता. तेव्हा बेस्ट बस बंद पडल्याने तेथे प्रवाशांची गर्दी झाली. गर्दीचा गैरफायदा घेत चोरीच्या प्रयत्नात असताना सतर्क तरुण रवीराज शिंदे, अजय सावंत, दत्ता दाभोळकर, राजेश हजारे यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे बसमधील एका प्रवाशाचे चोरी झालेले पाकीट आढळून आले. तरुणांनी सूर्याला पवई पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)