Join us

सराईत दरोडेखोरास मुंबईत अटक

By admin | Updated: December 24, 2016 03:44 IST

जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, बेकायदा अग्निशस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुरुवारी

मुंबई : जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, बेकायदा अग्निशस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुरुवारी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. करण राजाराम निशाद (३८) असे आरोपीचे नाव आहे. जबरी चोरी दरोडाविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. नालासोपाऱ्याचा निशाद गुरुवारी धारावी बस डेपो परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार जबरी चोरी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांच्या पथकाने सापळा रचला. साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, नागेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक अमित भोसले, पोलीस अंमलदार उल्हास परब, अशोक सावंत, गिरीश जोशी, नितीन जाधव, दीपक कोणी या पथकाने निशादच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध मुंबईसह सुरत, नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यात सुरतच्या कामरेज पोलीस ठाण्यात, नागपूरचे कोराडी, तहसील पोलीस ठाणे तसेच मुंबईच्या कांदिवली व ओशिवरा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)