जितेंद्र कालेकर, ठाणेठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये २००८ मध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या वेस्टर्न रेल्वेच्या संतोषकुमारने ती स्पर्धा अर्ध्यावरच सोडली होती. त्यानंतर २००९ मध्ये तो अकराव्या क्रमांकावर यशस्वी ठरला. आता रौप्य महोत्सवी वर्षात अव्वल ठरलेल्या संतोषला भारतीय रेल्वेची चेन्नई येथे होणारी स्पर्धा जिंकण्याची मनीषा असल्याची प्रतिक्रिया त्याने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.आपण ठाण्याची स्पर्धा जिंकू असे अगदी ९९ टक्के वाटत होते, असेही तो सांगत होता. यासाठी दोन महिने चांगला सरावही केला. किती आणि कोणते स्पर्धक सहभागी होतील याचाही अंदाज घेतला होता. सकाळी आणि सायंकाळी असे रोज ३० किमीचा सराव केला. खड्ड्यांचीही तशी सवय असल्यामुळे त्याचा फारसा त्रास जाणवला नाही. ठाण्यातील आयोजकांनी एकेक किलोमीटरवर पाण्याची व्यवस्था केल्याने खूप सोयीस्कर झाल्याचेही त्याने सांगितले. यापूर्वी २१ किमीची स्टॅण्डर्ड मुंबई मॅरेथॉन २००९ आणि २०१० मध्ये जिंकली असून, दिल्ली येथील एअरटेलच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेतही २००९ मध्ये प्रथम तर २०१० मध्ये द्वितीय क्रमांक पटकावल्याचे त्याने सांगितले.
संतोषकुमारला व्हायचे आहे चेन्नई एक्स्प्रेस
By admin | Updated: August 24, 2014 23:51 IST