ठाणो : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर सततच्या या पावसामुळे शेतक:यांना कामे करता येत नसल्यामुळे शेतात गवताचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यात मागील 24 तासांच्या कालावधीत 111क्.7क् मिमी पाऊस पडला असून, सरासरी 74.क्5 मिमी या पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्व नद्यांना पूर आला असून, गुरवली, रूंदा पूल पाण्याखाली आला असून, भिंवडीनजीकचा जांभिवली पूल तुटल्याने तीन गावांचा संपर्क तुटला आह़े शेतीत पाणी घुसून पिके कुजल्याने बळीराजाही चिंतातुर झाला असून, उल्हानगरात एक जण वाहून गेला आह़े
शहापूर तालुक्यात सर्वाधिक 18क् मिमी पाऊस पडला असून, मुरबाड तालुक्यात 112 तर अंबरनाथमध्ये 87 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वात कमी पाऊस डहाणू तालुक्यात 23 मिमी झाला आहे. या पावसासह जिल्ह्यात आजर्पयत 24क्87 मिमी पाऊस पडला असून, सरासरी 16क्6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आजच्या दिवसार्पयत 32779.74 मिमी पाऊस पडला असता सरासरी 2185.32 मिमी या पावसाची नोंद झालेली आहे.
जांभिवली गावचा पूल तुटल्याने तीन गावांचा संपर्क तुटला
अनगाव : दहा दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जांभिवली गावाला जोडणारा नदीवरील पूल तुटल्याने जांभिवलीसह दोन आदिवासी पाडय़ांचा भिवंडीशहरापासून संपर्क तुटला असून, पाच दिवसांपासून कामगार, विद्याथ्र्याना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.
वळवीपाडा, वारळीपाडा, जांभिवली या तीन गावांची याच पुलावरून रहदारी होती. सदर पूल हा पंचायत समिती भिवंडी बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असून, त्यांनी पहाणी करून गेल्यापासून पुन्हा परतले नसल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. तर या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
1ठाणो जिल्ह्यातील पाच महापालिकांसह 2 नगरपालिका आणि 42 गावांसह एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण सोमवारी दुपारी 3 वाजेपासून ओसंडून वाहू लागले आहे. गेल्या वर्षी हे धरण 2क् जुलै रोजी भरले होते. बारवी भरल्याने यंदा बारवीतून पाणीपुरवठा होणा:या शहरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे अंबरनाथचे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रंना पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण उभारण्यात आले.
2मात्र औद्योगिक शहरांची पाण्याची तहान भागविण्यासोबत या धरणातील पाणी जिल्ह्यातील ठाणो, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर, नवी मुंबई या महापालिकांसह अंबरनाथ-बदलापूर नगर परिषदांसह कल्याण तालुक्यातील 42 गावांना पुरविण्यात येत आहे. बारवी धरणाच्या पाण्याची क्षमता ही 172 दशलक्ष घनमीटर एवढी आहे; तर धरणाची उंची ही 65.15 मीटर एवढी आहे.
3या धरणाची उंची वाढविण्यात आलेली असली तरी अजून या धरणावर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे धरण भरल्यावर पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक मार्ग तयार करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी धरणातील पाण्याची पातळी 65.15 मीटर एवढी झाली आणि हे धरण भरून वाहू लागले. धरण भरल्यावर प्रत्येक सेकंदाला धरणातून 16 मेट्रिक क्युबिक एवढय़ा पाण्याचा विसर्ग होत आहे.
4बारवी धरणातून कल्याण डोंबिवली शहराला 11क् दशलक्ष लिटर्स, उल्हासनगर 2क्, ठाणो शहरासाठी 12क्, नवी मुंबईसाठी 7क्, ठाणो बेलापूर औद्योगिक क्षेत्रसाठी 4क्, डोंबिवली एमआयडीसी 3क्, मीरा भाईंदर 1क् आणि अंबरनाथ शहरासाठी 5 दशलक्ष लिटर्स एवढय़ा पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणातील 8क् टक्के पाणी नागरिकांसाठी तर उर्वरित पाणी औद्योगिक क्षेत्र आणि शेतीसाठी पुरविण्यात येते. धरण भरल्याने आता पाण्याचा तसेच या धरणावरून केल्या जाणा:या वीजनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
काळू नदीवरील गुरवली व रुंदा पूल पुन्हा पाण्याखाली
1टिटवाळा - कल्याण तालुक्यातील काळू नदीला गेल्या 1क् दिवसांत तिस:यांदा पूर आल्याने गुरवली व रुंदा गावांजवळील पूल सोमवारी पुन्हा पाण्याखाली गेले. यामुळे येथील 2क् ते 25 गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
2मुसळधार पावसाने गेल्या 1क् दिवसांपासून कल्याण तालुक्यातील जनतेला अक्षरश: झोडपून काढले. बळीराजासह सामान्य जनता कमालीची त्रस्त झाली आहे. जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पावसाची थोडा वेळ उघडीप मिळते नि लगेच जोरदार सुरुवात करून पूर परिस्थिती निर्माण करतो. यामुळे काळू नदीवरील रुंदा व गुरवली हे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने 2क् ते 25 गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे.
3या कारणास्तव शेतकरी, दूधवाले, भाजीवाले व कामगार यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच या गावांतील शेकडो शालेय विद्याथ्र्याचेदेखील शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने या बाबींची दखल घेऊन या पुलांची उंची वाढवून सदर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी येथील शेतकरी, कामगार, उद्योजक व शालेय विद्यार्थीवर्गातून केली जात आहे.
शहापुरात मुसळधार; शाळा दिल्या सोडून
1भातसानगर - सतत पडणा:या पावसाचा जोर रात्रीपासूनच वाढल्याने मात्र सकाळपासूनच नद्यांना व ओहळांना आलेल्या पुरांमुळे शाळा सकाळी सोडून देण्यात आल्या तर काही शाळा भरल्याच नाहीत.
2रात्रभर मुसळधार कोसळणा:या पावसामुळे नद्या ओढय़ांना पूर आल्याने शहापुरातील काही शाळा भरल्या नाहीत़ त्तर बाहेर गावाहून येणा:या विद्याथ्र्याना घरी पाठविण्यात आल़े काही शाळा मधूनच सोडल्याने बस स्थानकात आपाआपल्या गावाकडे जाणा:या बसच्या आशेने तासन्तास विद्यार्थी ताटकळत उभे होते. रिक्षा वाहतूक ही बंद होती़ त्यामुळे विद्याथ्र्याना पाण्यातून जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागला होता.
3वाढत्या इमारतींच्या भरावामुळे मराठा खानावळजवळ पाणीच पाणी झाले असून गोपाळनगरसह वरील भागात मोठय़ा प्रमाणात इमारतींसोबत केलेल्या भरावामुळे एसबी कॉलेज मार्गावरील पाण्यात वाढ होऊन अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल़े तर या पूरपरिस्थितीमुळे मुख्य रहदारीचा रस्ताच बंद झाला.