Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांताक्रूझ जैन तपगच्छ संघाचा अमृतमहोत्सवी सोहळा

By admin | Updated: February 21, 2017 06:51 IST

श्री सांताक्रूझ जैन तपगच्छ संघाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला २५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. संघाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल

मुंबई : श्री सांताक्रूझ जैन तपगच्छ संघाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला २५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. संघाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संघाने २५ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान विशेष सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी ठेवली आहे. या कार्यक्रमांतर्गत  पूजन, मिरवणूक, भव्य महापूजा  तसेच महाआरतीचे आयोजन केले आहे. संघाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या शनिवारी सायंकाळी ईश्वरभक्तीचा कार्यक्रम आहे. त्यात कलाकार पार्थिव गोहिल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सामील होणार आहेत. तर रविवारी सकाळी विशाल रथयात्रा काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी महापूजा ठेवण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी हिमांशू यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. मंगळवारी सायंकाळी ‘स्वरांपासून ईश्वरापर्यंत’ या नावाचा विशेष कार्यक्रम अतुल शाह यांच्या नेतृत्वाखाली साजरा होईल. बुधवारी, १ मार्चला श्री कुंथुनाथ जिनालयाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा सोहळा सादर होईल.वरील सर्व कार्यक्रमाला प.पु. आचार्य श्री राजेंद्रसुरीश्वरजी महाराज - आदिठाणा, प.पु. आचार्य श्री मेघदर्शनसुरीश्वरजी महाराज - आदिठाणा, तसेच राष्ट्रसंत प.पु. आचार्य श्री पद्मसागरसुरीश्वरजी महाराजांचे शिष्यरत्न प.पु. श्री नयपद्मसागरजी महाराज - आदिठाणा यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती श्री सांताक्रूझ जैन तपगच्छ संघाचे प्रमुख हिरजी मोरारजी शाह यांनी दिली. (प्रतिनिधी)