Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनी, संतोषकुमार अजिंक्य

By admin | Updated: August 24, 2014 23:48 IST

‘रन फॉर फन’ या ड्रीम रनसह आयोजित करण्यात आलेली रौप्य महोत्सवी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा पश्चिम रेल्वेच्या संतोषकुमार सिंग याने जिंकली.

ठाणे : ‘रन फॉर फन’ या ड्रीम रनसह आयोजित करण्यात आलेली रौप्य महोत्सवी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा पश्चिम रेल्वेच्या संतोषकुमार सिंग याने जिंकली. त्याने एक तास नऊ मिनिटे ३० सेकंदांत २१ किलोमीटरचे अंतर पार केले. महिला गटात नाशिकची आंतरराष्ट्रीय खेळाडू संजीवनी जाधव हिने एक तास १८ सेकंदांत प्रथम येण्याचा मान पटकावला. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्पर्धेची सुरुवात सकाळी महापालिका भवनासमोरून झाली. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, मंगेश देसाई, संतोष जुवेकर, ठाणे आर्ट गिल्डचे (टॅग) अध्यक्ष अशोक नारकर, महापौर हरिश्चंद्र पाटील, पालिका आयुक्त असीम गुप्ता आदींनी फ्लॅग आॅफ करून स्पर्धेला सुरुवात करून दिली.