Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत लीलावती रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:17 IST

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना बुधवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर गतवर्षी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली ...

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना बुधवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर गतवर्षी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल एक वर्षाने त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने पुन्हा ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

लीलावती रुग्णालयातील डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत यांच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळले होते, त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर एप्रिल २०२० मध्ये आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, काेरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

………………………………..