Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांनी आरोप फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वतीने काही माणसांनी आपल्यावर पाळत ठेवली व हल्लेही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वतीने काही माणसांनी आपल्यावर पाळत ठेवली व हल्लेही केले, असा आरोप एका ३६ वर्षीय महिलेने याचिकेद्वारे केला आहे. राऊत यांनी हे सर्व आरोप उच्च न्यायालयात फेटाळले.

संजय राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफाळके यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाला सांगितले की, याचिकाकर्ती ही मला मुलीप्रमाणे आहे. पती आणि तिच्यामध्ये वाद आहेत आणि मी त्यात तिच्या पतीची बाजू घेत असल्याने ती आपल्यावर खोटे आरोप करत आहे.

संबंधित महिला ही व्यवसायाने मानसोपचार तज्ज्ञ आहे. तिच्या म्हणण्यानुसार, राऊत यांच्या वतीने काही अज्ञात लोक तिचा पाठलाग करून तिची छळवणूक करत हाेते. याचिकेनुसार, तिने यासंबंधी २०१३ व २०१८ मध्ये तीन गुन्हे नोंदविले. तरीही त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले की, २०१९ मध्ये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने याचिकाकर्तीला दोषारोपपत्राची देण्याचे निर्देश सरकारी वकिलांना देत पुढील सुनावणी १९ मार्च रोजी ठेवली.

..................