Join us  

संधी मिळाल्यास राहुल गांधी यांच्याकडे भूमिका मांडणार-संजय निरुपम

By मनोहर कुंभेजकर | Published: March 15, 2024 6:12 PM

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाबाबत सोशल मीडियावर व पत्रकार परिषद घेत जाहिर नाराजी व्यक्त केली होती

मनोहर कुंभेजकर

मुंबई-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून गेल्या शनिवारी शिवसेना शाखांच्या भेटी दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेना उपनेते व युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाबाबत सोशल मीडियावर व पत्रकार परिषद घेत जाहिर नाराजी व्यक्त केली होती. तर निरुपम यांनी गेल्या मंगळवारी भाजप नेते,राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत निरुपम हे भाजपात प्रवेश करतील आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील अशी देखिल राजकीय वर्तुळात आणि मतदार संघात चर्चा आहे.

दरम्यान याबाबत लोकमतच्या सदर प्रतिनिधीने निरुपम यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी सांगितले की,आपण येत्या रविवारी काँग्रेसचे जेष्ठ नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान आपल्याला जर संधी मिळाली तर ही जागा काँग्रेसला मिळण्यासाठी आपण आपली भूमिका त्यांच्याकडे मांडणार आहे. तर भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची आपण सदिच्छा भेट घेतली होती,मात्र भाजपात आपण जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, राहुल गांधी यांच्या भेटी नंतर  निरुपम कोणती राजकीय भूमिका घेणार ? याकडे राजकीय वर्तुळात आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे  लक्ष लागले आहे.

टॅग्स :संजय निरुपमराहुल गांधी