Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय कपूरवर गुन्हा दाखल

By admin | Updated: February 27, 2016 02:53 IST

अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या तक्रारीवरून त्यांचे पती तथा दिल्लीतील रहिवासी उद्योगपती संजय कपूर आणि सासू राणी सुरिंदर कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात

मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या तक्रारीवरून त्यांचे पती तथा दिल्लीतील रहिवासी उद्योगपती संजय कपूर आणि सासू राणी सुरिंदर कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करिश्मा यांनी याबाबत हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार खार पोलिसात दिली होती. त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, करिश्माचा जबाब घेण्यात आलेला आहे. तथापि, या प्रकरणात अटक करण्यापूर्वी आरोपांची चौकशी करण्यात येईल. संजय कपूर यांच्या वतीने दाखल घटस्फोटाच्या अर्जात म्हटलेले आहे की, करिश्माने अभिषेक बच्चनसोबत ब्रेक अप झाल्यानंतर केवळ पैशांसाठी संजय कपूर यांच्यासोबत विवाह केला. याबाबत बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, करिश्मा कपूर यांची लेखी तक्रार आली आहे. करिश्माचा जबाबही घेण्यात आला आहे. त्यानंतर संजय कपूर आणि त्यांची आई राणी कपूर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ) आणि ३४नुसार हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास सुरू आहे. संजय कपूर यांनी असाही दावा केला आहे की, आपल्याकडून पैसे घेण्यासाठी करिश्मा आपल्या मुलांचा वापर प्याद्यांसारखा करते. (प्रतिनिधी)