Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचा-यांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स, पश्चिम रेल्वेचा उपक्रम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 06:03 IST

महिला अधिकारी-कर्मचा-यांसाठी दिलासा देणारा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात आणि मुंबई सेंट्रल येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या इमारतीत सॅनिटरी नॅपकिन यंत्रणा बसविण्यात आली आहे.

मुंबई : महिला अधिकारी-कर्मचा-यांसाठी दिलासा देणारा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात आणि मुंबई सेंट्रल येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या इमारतीत सॅनिटरी नॅपकिन यंत्रणा बसविण्यात आली आहे. वेस्टर्न रेल्वे वूमनवेल्फेअर असोसिएशनने (डब्ल्यूआरडब्ल्यूडब्ल्यूओ) मशीन बसविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.पश्चिम रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा अर्चना गुप्ता यांनी चर्चगेट येथील मशीनचे उद्घाटन केले. या वेळी गुप्ता म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून सॅनिटरी नॅपकिन मशीनची मागणी प्रलंबित होती.या सुविधेमुळे पश्चिम रेल्वेवरील महिलांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर महिला प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. मुंबईसह पश्चिम रेल्वेच्या अन्य ६ विभागीय कार्यालयांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यात चर्चगेट मुख्यालयासह वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर या विभागांचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वे