लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सॅनिटरी नॅपकिन्स सामान्य महिलांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. नॅपकिन्सवर प्रस्तावित वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंतर्गत बारा टक्के कर लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय जाचक आहे. सॅनिटरी नॅपकिन तत्काळ जीएसटीमुक्त करावेत, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने केली. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आणि स्वाक्षरी आंदोलन करण्यात आले. या वेळी वाघ म्हणाल्या की, जगभरात २७ टक्के महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. यात भारतीय महिलांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्याचा विषय गांभीर्याने घेत सॅनिटरी नॅपकिन्स जीएसटीमुक्त करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
सॅनिटरी नॅपकिन्स ‘जीएसटी’मुक्त करा, राष्ट्रवादीची निदर्शने
By admin | Updated: May 30, 2017 04:29 IST