नवी मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार संदीप नाईक यांनी ८७२५ मतांनी विजय मिळवत ऐरोलीचा गड राखला. बंडखोरीमुळे शिवसेनेला या मतदारसंघात पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला असून निकालामध्ये २००९ ची पुनरावृत्ती झाली. लोकसभेत ठाणे मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसला पराभवाचा धक्का बसल्यामुळे सर्वांचे लक्ष विधानसभेच्या निकालाकडे लागले होते. राष्ट्रवादीकडून संदीप नाईक, शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख विजय चौगुले व भाजपामधून सेनेमधील बंडखोर उमेदवार वैभव नाईक रिंगणात होते. २००९ च्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही सुरुवातीच्या १७ फेऱ्यांमध्ये शिवसेनेचे विजय चौगुले पुढे होते. परंतु १८ व्या फेरीपासून राष्ट्रवादीचे मताधिक्य वाढले व अखेर ऐरोली ताब्यात ठेवण्यात पक्षाला यश मिळाले. बंडखोरीने यावेळीही शिवसेनेचे या ठिकाणी भगवा फडकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.(प्रतिनिधी)निवडणुकीपूर्वी या मतदार संघात शिवसेनेचे पारडे जड होते. परंतु उमेदवारीचा घोळ व नंतर वैभव नाईक यांनी केलेली
ऐरोलीत संदीप नाईकांचा विजय
By admin | Updated: October 20, 2014 03:42 IST