Join us
Daily Top 2Weekly Top 5

संदीप गायकवाड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

By admin | Updated: June 10, 2015 02:41 IST

बीएसपी नेते संदीप गायकवाड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर : बीएसपी नेते संदीप गायकवाड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगर कॅम्प नं-३, चोपडा कोर्ट आंबेडकर नगरात राहणारे बीएसपीचे नेते गायकवाड यांनी शेजारील २० वर्षाच्या तरुणीचे आंघोळ करताना चोरून फोटो काढले होते. ते प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन अनेक महिन्यांपासून अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. अत्याचार सहन न झाल्याने तक्रार करण्यास निघालेल्या या तरुणीला भर रस्त्यात मारहाण करून विवस्त्र करण्याचा प्रयत्न गायकवाड कुटुंबाने केल्याचा आरोप आहे. या प्रकाराने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यवर्ती पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.