मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून केईएम रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्रमुळे येथील कर्मचारी कमालीचे त्रस्त आहेत. विनाकारण होणा:या बदल्यांविषयी इतके दिवस दबक्या आवाजात होणारा निषेध गेल्या दोन दिवसांपासून कर्मचारी, कामगार उघडपणो व्यक्त करीत आहेत. शुक्रवारी दुपारी केईएम रुग्णालयात ठिकठिकाणी ‘सापा’ (डॉ. मिलिंद साळवे आणि डॉ. शुभांगी पारकर)च्या विरोधात पोस्टर लावण्यात आले होते.
गुरुवारी केईएम रुग्णालयातील उप - अधिष्ठाता यांच्या कार्यालयात एका महिला कर्मचा:याने घातलेला गोंधळ ताजा असतानाच शुक्रवारी केईएम रुग्णालयाच्या परिसरात त्यांचा जाहीर निषेध करणारे पोस्टर म्युनिसिपल मजदूर युनियनतर्फे लावण्यात आले आहे.
कर्मचारी-कामगार यांच्या बदल्यांच्या बरोबरीनेच कामगार - कर्मचा:यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांना वेळ नाही, मागील तीन महिने तक्रार निवारण समितीची बैठक झालेली नाही, डी.डी.एफ.मधील भ्रष्टाचार लपविण्यासाठी प्रशासनाकडे भरपूर वेळ आहे, डीन पदावर कायमस्वरूपी नियुक्ती मिळविण्यासाठी पारकर मॅडम सत्ताधा:यांची हाजी हाजी करतात, असे आरोप करण्यात आले आहेत.
खूप दिवस आम्ही हे सहन केले आहे, मात्र आता नाही. त्यामुळे यांच्याविरोधात आता आंदोलन करण्याची तयारी करण्याचे आवाहन कर्मचा:यांना आम्ही केले असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव महेश दळवी यांनी सांगितले.
या प्रकरणाबाबत केईएम रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. (प्रतिनिधी)
‘केईएम रुग्णालयातील कामगार - कर्मचा:यांना ‘सापा’चा त्रस’ अशा मथळ्याखाली हे पोस्टर लावण्यात आले आहे. तर केईएमच्या प्रभारी अधिष्ठाता यांच्या विरोधात ‘डीन, केईएम आपली कोणती ‘नीती’?’ या कवितेचे पोस्टर लावले आहे.