Join us

सना खानने केली फसवणुकीची तक्रार

By admin | Updated: November 1, 2014 23:14 IST

सना खानने केली फसवणुकीची तक्रार

सना खानने केली फसवणुकीची तक्रार
मंुबई:
विनयभंगाच्या गुन्ह्यात नुकत्याच अटक झालेल्या अभिनेत्री सना खान हिने याप्रकरणी तक्रार करणार्‍या ४० वर्षीय महिलेविरोधातच घरे आणि फ्लॅट देण्याच्या बहाण्याने ९ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. सना खानच्या तक्रारीवरुन ओशीवरा पोलिसांनी ४० वर्षीय महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
ओशिवरा परिसरातील उच्चभू्र वसाहतीत राहणार्‍या अभिनेत्री सना खान हीची ४० वर्षीय महिलेशी ओळख झाली होती. मालाड येथे पुनर्विकासात येणारे दोन झोपडे आणि गोरेगाव येथे ओमकार डेव्हलपर्समध्ये फ्लॅट घेवून देण्याच्या बहाण्याने ऑगस्ट महिन्यापासून २८ ऑक्टोबर या कालावधीत या महिलेने तब्बल ९ लाख रुपये उकळले. आपण फसल्याचे लक्षात येताच, या महिलेकडे पैशांची मागणी केली असता, तिने पोलिसांकडे गुन्हे दाखल करुन करुन करियर बरबाद करण्याची धमकी दिल्याचे, अभिनेत्री सना खान हिने तक्रारीत नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अभिनेत्री सना खान हिने ज्या महिलेविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. त्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुनच आंबोली पोलिसांनी सना खानसह पती आणि अन्य एका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. (प्रतिनिधी)